नागार्जुनसागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प
अरण्याबद्दल थोडसं :
आंध्र प्रदेशातील नागार्जुनसागर धरणाजवळ असलेला, पाच जिल्ह्यांत विस्तारलेला नागार्जुनसागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प हे खऱ्या अर्थाने निसर्गसमृध्द जंगल आहे. या जंगलात १९८३ साली वन्यजीवन अभयारण्य तर १९९२ साली व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला.
या जंगलात वाहनातून फिरून वन्यजीवन निरीक्षण करता येते .
राज्य: आंध्र प्रदेश
कुठे आहे : आंध्र प्रदेशातील नागार्जुनसागर धरणाच्यापरिसरात
अंतर : हैद्राबादपासून ३१६ कि. मी. वर.
जाण्याचा उत्तम काळ : मार्च ते जुन
वन्य प्राणी : वाघ , बिबळा, हनुमानवनार, रानडुक्कर, झिपरे अस्वल, रानकुत्रा,चांदी अस्वल, साळींदर,खवल्या मांजर, चितळ, सांबर, नीलगाय, काकर, पिसोरी, चिंकारा,मुंगूस.
पक्षीजीवन : महाभृंगराज, नीलपुच्छ, वेडाराघू,मोठाकुहुवा,हरेवा,चष्मेवाला,स्वर्गनांचण, नीलमणी,थोरला धोबी, करण पोपट, टकाचोर, मुनिया, रानभाई,वटवट्या, आणि अजून बरेच
Leave a Reply
You must be logged in to post a comment.