मोरगाव – मयूरेश्वर
मोरगाव हे अष्टविनायक-क्षेत्र कऱ्हा नदीकाठी ता. बारामती जि. पुणे या ठिकाणी वसले आहे .
मोरगावचा मयूरेश्वर हे श्री गणेशाचे आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रात जशी देवीची साडेतीन शक्तिपीठे मानली जातात, त्याचप्रकारे श्री गणेशाची साडेतीन आद्यापीठे मानतात . मोरगावच्या श्री गणेशाला मयूरेश्वर किंवा मोरेश्वर असे म्हणतात . या पीठाचे माहात्म्य पुराणात सहाव्या खंडात वर्णन केलेले पाहावयास मिळते .
या क्षेत्राची आख्यायिका
प्राचीन काळातल्या गंडकी नगरात सिंधू नावाचा दैत्यराजा राज्य करीत होता . सिंधूने सूर्याची उपासना करून स्वतःला अमरत्व प्राप्त करून घेतले होते . यामुळे त्याला कसलिही भीती किंवा धाक वाटत नव्हता . तो उन्मत्त आणि गर्विष्ठ झाला . आपण त्रिलोकाचे स्वामी व्हावे, हि महत्वाकांशा त्याच्या मनात निर्माण झाली . अत्याचार करून त्याने पृथ्वी जिंकली. स्वर्गाचा अधिपती होऊन तो सत्ता गाजवू लागला . अनेकांना त्यांनी बंदिवासात टाकले . हे संकट दूर करण्यासाठी सर्व देवांनी श्री गणेशाकडे धाव घेऊन त्याला सिंधूदैत्याचे संकट दूर करण्याची विनंती केली . देवाच्या विनंतीला मान देऊन गणेशाने संकट दूर करण्याचे अभिवचन दिले .
त्यानुसार गणेशाने शंकर-पार्वतीच्या पोटी जन्म घेतला . सिंधू या दैत्याशी युद्ध करून त्याचा आणि कमलासूराचा वध केला या ठिकाणी गणेशाने मोरावर स्वर होऊन य युद्ध केले. मोरावर बसून असुरांचा संहार करणारा ईश्वर म्हणून गणेशाला श्री मयुरेश्वर किंवा मोरेश्वर असे नामाभिमान प्राप्त झाले . ज्या ठिकाणी या दैत्याचा वध होऊन देव संकटमुक्त झाले तेच हे स्थळं होय . ब्रह्म, विष्णू , महेश , शक्ती, आणि सूर्य या पाच देवतांनी या स्थळी अनुष्ठाने करून गणेशपीठाची स्थापना केली . येथील मंदिर ब्रह्मदेवाने उभारले, असे सांगितले जाते. मंदिराच्या प्रवेशदारावरील श्लोकात ब्रह्मदेवाचा उल्लेख आढळून येतो. अशाप्रकारे मोरगावचे प्राचीनत्व आणि येथील श्री गणेशाचा महिमा कळून येतो .
Leave a Reply
You must be logged in to post a comment.